हे खरोभर दुर्भाग्यपूर्ण आहे की २०१८ मध्ये भारतामध्ये जातीय कलहाचे दृश्य दिसत आहे. हा जातीय तनाव जर का वेळीच थांबविला नाही तर भयंकर आंतर्गत युद्ध होऊ शकेल. वृत्त माध्यमे आणि जिग्नेश मेवाणी आणि राहुल गांधी सारखे “तरुण” राजकरणी ह्या जातीय तनावाच्या भडक्यात तेल टाकत आहेत.
ही ट्वीट राहुल गांधीने भीमा कोरेगाव हिंसेच्या दिवशी केलेली होती:
अनुवाद: भाजपा आणि रा. स्व. सं. ह्यांची फासिवादी विचारसारणी ही आहे की दलीतांनी समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावर राहावं. उना, रोहित वेमुला आणि भीमा-कोरेगाव आता (ह्या विचारसरणीच्या) प्रखर विरोधाची चिन्हे आहेत.
सध्याचे वर्तमान राष्ट्रपति (कोविन्द), जे भारताचे सर्वेसर्वा असतात, हे हिंदू असून दलित समाजातले आहेत. (कोविन्द) हे भाजपा\रा.स्व.संघाचे केंद्र शासन असताना राष्ट्रपति झालेले आहेत. हे असूनसुद्धा पंतप्रधान पदाची आशा असलेल्या व्यक्तीने हे असे मिथ्या आणि खोडकर वक्तव्य केले.
नवीन बातम्यांसाठी सतत भुकेल्या असलेल्या भारतातील वृत्तमाध्यमानी हा वाद “दलित विरूढ हिंदू” असा दर्शवून आगील तेल ओतायचे काम केले.
खूप काळापासून भारताचा इतिहास खोटारड्या पणाने प्रस्तुत केला जात आहे, जेणेकरून भारतीय (हिंदू) समजातील (खरोखर उपस्थित असलेल्या किंवा अनुकल्पित) तिढ्याचा फायदा घेता यावा. बहुतांश वेळा आम्ही पहिले आहे की माध्यमे (मीडिया) हे समाजातल्या तिढा आणि वैमनस्य वाढवण्यासाथी उत्प्रेरकाचे कार्य करतात. ही माध्यमे मुख्यत्वाने अत्याचारचे, मग तो खरा असो व खोटा, वृत्त पसरवण्याचे कार्य करतात. अश्या तथाकथित अत्याचार तमाशाचे प्रसारण करणारे उदाहरन सोशल मीडिया वर आम्ही भीमा कोरेगाव “विजय सोहळ्याचा” दिवशी पहिले.
मागील काही वर्षात घरभेदी घटक जातीय हिंदू समाजामध्ये जातीय वैमनस्य रुजवायचे किंवा वाढवायचे कार्य करीत आहेत. हे घरभेदी घटक परकीय मदत घेतात आणि स्वतच्या फायद्यासाठी (आर्थिक किंवा राजकीय किंवा धार्मिक) समाजमाध्ये दुष्फळी निर्माण करायचे कार्य करत असतात. तथाकथित आणि विनापुरावा अत्याचाराचे कथन करून हे देशद्रोहि आणि हिंदू विरोधी घटक समाजामध्ये वैर निर्माण करतात. देशी आणि परदेशी माध्यमे तसेश भारतीय इतिहास आणि “दक्षिण एशिया अभ्यास” ह्याचे “अभ्यासक” हे अश्या विकृत कार्यासाठी हातभार लावताना आढळले आहेत.
हिंदू समजाच्या काही घटकामध्ये अत्याचार झाल्याची भावना रुजवणे हे अश्या समजविद्रोही तत्वांचे एकाच लक्ष्य आहे. अश्या कृत्रिम अत्याचाराची भावना रुजविल्यानंतर हिंदू समाज एकत्रित होऊ शकणार नाही. हेच लोक जातींशीवाय लिंग , धर्म असे निकष वापरुन पण समाजात निरनिराळे गट तयार करायच्या मागे असतात.
भीमा कोरेगाव चे युद्ध हे ब्रिटिश व मराठ्यांमध्ये झालेल्या अनेक युद्धांपैकी झालेल एक युद्ध आहे. पण अचानक हे युद्ध बातम्यामध्ये आहे. हे युद्ध, जे इतिहासताले एक किरकोळ युद्ध आहे, ते असे बातम्यामध्ये का असावे? ह्याचे कारण असे आहे की वर उल्लिखलेले घरभेदी घटक हे सतत अश्या युद्धाच्या शोधत असतात जे मागासलेले लोकांनी (दलित) ब्राहमणांविरुद्ध केले होते. परंतु त्यांना असे कोणतेच युद्ध मिळत नाहि आणि मिळणार सुधा नाही. अशी फक्त एकच घटना आहे जिच्या वस्तुस्थितिला मनासारखा आकार दिल्यानंतर अत्याचार तमाशा करता येतो – म्हणजे एका घटकाला (ब्राह्मण) अत्याचारी ठरवून दुसर्या घटकामध्ये (महार/दलित) अत्याचार झाल्याची भावना निर्माण करता येते.
आम्ही पुढे ह्या लेखात दाखवू की कोरेगाव हे युद्ध उच्चवर्णीय (सवर्ण) आणि दलित ह्यांच्यामध्ये नव्हते. इंग्रज लोक हे युद्ध जिंकलेसुद्धा नाहीत. तसेच आम्ही हेसुद्धा दर्शवायचा प्रयत्न करू की “दलित विरूढ सवर्ण” ही दंतकथा , जिथे फक्त दलित हे शोषित आहेत आणि सवर्ण हे अत्याचारी आहेत हा अतिशय खोटा व मिथ्या प्रचार वर्षानुवर्षं केला गेलेला आहे, जेणेकरून हिंदू समाजामध्ये फुट पडता यावी.
आम्ही हा लेख केवळ ह्या लेखाला प्रत्युत्तर म्हणून नाही तर हेसुद्धा दर्शवायला लिहीत आहोत की अत्याचाराचा तमाशा कसं ओळखावा. त्यामुळे हा लेख अश्या सर्व लेखांना जे हा अत्याचाराचा तमाशा दाखवतात त्यांनासुद्धा प्रत्युत्तर आहे !
उल्लेखलेला लेख हा असत्याने सुरुवात करतो.
भीमा कोरेगावचे स्मारक आणि त्याचा विजयोत्सव हा पेशव्यांवर इंग्रजांच्या सैन्यातील अस्पृश्य सैनिकांच्या विजयाशी जोडलेला आहे.
वस्तुस्थिती ही आहे की युद्ध हे पेशवा आणि ब्रिटिश साम्राज्यामध्ये होते. तसेश ही पण वस्तुस्थिती आहे की पेशवे हे ह्या युद्धामध्ये हरले नव्हते. ह्याचा पुरावा एक ब्रिटिश सैनिक आणि तत्कालीन उल्लेखनीय इतिहासक जेम्स ग्रँट डफ ह्यांनी लिहीलेल्या पुस्तकात मिळतो.
अनुवाद :“जेंव्हा अंधार पडला सेनापति स्तौंटन ह्याने खूप सारे जखमी सैन्य बरोबर घेऊन पुण्याच्या दिशेने सवारी केली. मग त्याने आपली वाट बदलून सेरूर (शिरूर) ला गेला”
चला आपण विसरून जाऊ डफ्फ ह्यांनी लिहिलेले पुस्तक आणि पकडू की ब्रिटिश जिंकले. आम्हाला सांगा..हा विजय ब्रिटीशांच्या ऐवजी दलितांचा कसा होतो? ब्रिटिश सैन्यामध्ये एक तरी महार \ दलित मुख्य पदावर होते का? त्यांना एका तरी दलित सरदारचा नाव सांगता येईल का हो ह्या युद्धात लढला? ह्या प्रश्नांचे उत्तर केवळ नकारात्मक आहे.
ब्रिटीशांनी दलितांना अशी कोणतेही मुख्य स्थान दिले नाही. जर का महार पदसैनिक असलेल्या ब्रिटिश सैन्याचा विजय हा महरांचा विजय आहे तर त्या निकशाने पहिले आणि दुसरे विश्व युद्धं भारतानेच जिंकले की !! एवढेच काय १८५७ च उठाव पण दलितांचा ब्राह्मणावर विजय म्हटलं पाहिजे कारण मजहबी दलित सिख आणि बॉम्बे रेजिमेंट मधील महारांनी ब्राह्मण मंगल पांडे , रानी लक्ष्मी बाई , तात्या टोपे आणि नानासाहेब ह्यांच्यावर विजय मिळवला !!
परंतु काल्पनिक कथा हे आमचे सामर्थ्य नाहीये. त्यामुळे आम्ही वस्तुस्थितिनुसार कोरेगाव युद्ध पाहू. आणि वस्तूस्थिती आहे की ब्रिटिशांनी हे युद्ध जिंकले नाही. ब्रिटिशांनी माघार घेतली होती. ब्रिटीशांनी स्वतः हा विजय आहे असे मानले नव्हते. मार्च १८१९ मध्ये झालेल्या ब्रिटिश संसदेत चर्चेत ब्रिटीशांनी कोरेगावचे असे वर्णन केले आहे:
शेवटी त्यांनी (पेशव्यांनी) केवळ विनाहानी माघारच भेटली नाही तर त्यांनी आपले जखमी झालेले सैनिक पण परत नेले.
“In the end, they secured not only unmolested retreat, they also carried off their wounded”
खरी गोष्ट ही आहे की ब्रिटिश हे आपल्या मोहिमेत सपशेल फेल झाले. ब्रिटीशांनी १ जानेवरी १८१८ ला पेशवा राजधानी (पुणे) जिंकण्यासाठी सैन्य शिरूरवरुन पुण्याकडे नेले होते. पण त्यांची मध्येच कोरेगावत मराठ्यांनी वाट रोखली. हे खरे आहे की ब्रिटिश आणि त्यांचे शिपाई (दलित आणि अन्य) शौर्याने लढले आणि त्यांनी मराठ्यांवर खूप आघात केला. पण त्यांना स्वतःला सुधा खूप नुकसान झाल आणि त्यामुळे त्यांना पुण्याची मोहीम रद्द करून शिरूरला परत जाव लागला. [1]
आणि त्या दलितांनी ज्यांनी ब्रिटीशांसाठी प्राणत्याग केला, त्यांचे ऋण ब्रिटीशांनी कसे फेडले? त्यांनी महरांना ब्रिटिश सैन्यात घेण बंद केल ! हे सांगत की “महार हे लढवये नाहीत परंतु खालच्या जातीचे अस्पृश्य आहेत”.[2]
त्याहून पुढे जाऊन ब्रिटीशांनी भटक्या जाती जमाती आणि पूर्वीचे “अस्पृश्य” ह्यांची “गुन्हा प्रवृत्तीच्या जाती” अशी नोंदणी केली. ह्या समाज घटकांचे सर्व लोक “मूलतः गुन्हा करणारे आहेत” असे सांगून त्यांच्या हालचालींवर नियंत्रण आणण्यात आला. ह्या समाजाच्या सर्व पुरुषांना दर आठवड्यात जवळच्या पोलीस चौकीत जावे लागे.[3] स्टीफन कोहेन ह्यांनी नोंदविले आहे की ब्रिटीशांनी भारत जिंकल्यावर “अस्पृश्य” लोकांना “निरुपयोगी सैनिक” म्हणून हेटाळल आणि सैन्यातून काढून टाकला. तसेच ब्रिटीशांनी तीव्र जातिभेद करत “उच्च जातीतले देखणे पुरुष” सैन्यामध्ये घ्यायला सुरुवात केली.
“धोब्याला सैन्यामध्ये कशाला घ्यावं, ते कडवट आणि लढवय्ये अश्या पठाणांशी युद्ध करू शकत नाहीत” अस पायोनीअर संपादकात (एक ब्रिटिश मासिक) लिहिण्यात आले होते. ब्रिटीशांच्या मत होते की “मागासवर्गीय\दलित\अस्पृश्य हे फार मवाळ असतात त्यामुळे ते फक्त चौकीदारि किंवा सैन्याची सेवा करणार्या तुकड्या ह्यामध्येच असावे परंतु सैनिक म्हणून खूपच खराब आहेत. शरीराने मोठे , देखणे आणि हुशार सैनिक हे उच्चवर्नियातच आहेत”.
ब्रिटीशांचा “आर्य वर्ण” आणि “लढाऊ वर्ण” ह्यावर विश्वस असल्याने त्यांनी महारांना नंतर सैन्यात घेणे बंद केले. त्यानंतर महारांनी ब्रिटीशांना पत्र लिहिले ज्याच्यात त्यांनी संगितले की “आम्ही क्षत्रीय आहोत” आणि विनंती केली की आम्हाला (ब्रिटिश) सैन्यात प्रवेश करू द्यावा. हे इथे नमूद करावे लागेल की ब्रिटीशांच्या वेळचे महार हे जिग्नेश मेवानीसारखे अजिबात नवते. आंबेडकरांचे वडील हे स्वतः महार सैनिक होते आणि धार्मिक हिंदु होते. ते सतत रामायण महाभारत वाचायचे. हे खरोखर उपरोधिक आहे की आजचे “दलित” युवा नेते ब्रिटिश आणि त्यांच्या सैन्याचा विजय साजरा करतात.
वर उल्लेखलेल्या लेखात पुढे लिहिला आहे:
“(दलित समाजाने) मोठ्या संख्येने भीमा कोरेगावला जमा होणे आणि कोरेगाव लढाईची आठवण आणि नोंद घेणे हे त्या जातीव्यवस्थेच्या विरोधात आहे , जी व्यवस्था दलितांना सशस्त्र क्रांति करण्यास नकार देते. मनुस्मृती सारख्या पुरातन हिंदू ग्रंथांनी स्पष्ट सांगितले आहे की दलित किंवा मागासवर्गीयांना, शुद्रांना आणि अतीशुद्रांना स्वतः चे रक्षण कार्याचा अधिकार नाही. कोरेगावची आठवण ह्या जांचक अटीला झुगारून देते.
तसेच (कोरेगावची स्मृति) हिंदू राष्ट्रावादाच्या मानसिकतेच्या विरोधात आहे, ज्यामध्ये दलित ह्यांनी खाली मान घालून काम करावे आणि निमूटपणे जातीय अत्याचार आणि जातीव्यवस्था सहन करावी. ह्या प्रकारे कोरेगावचा स्मृति सोहळा साजरा करून दलित ह्या मानसिकतेला ठामपणे “आता अजून नाही” असे म्हणत आहेत. ते सांगत आहेत की “आम्ही ती सशतरा क्रांति साजरी करू जो आमचा इतिहास आहे. उच्चवर्णीयांनी आमचा इतिहास दाबला आहे किंवा आमचा इतिहास विकृत केला आहे कारण आमचा इतिहास हिंदू राष्ट्रावादासाठी सोईस्कर नाहीये. त्यांची इतिहासावरची पकड ठेवण्यासाठी ते आमच्या पर्यायी इतिहासाला नाकरतात”.
तुम्ही नक्कीच ह्या लेखातला “अत्याचार तमाशा” ओळखला असेल. “अत्याचार तमाशा” चे एक प्रमुख चिन्ह असते की हा “तमाशा” भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानकाळात परावर्तीत करतो. हा लेख, जो २१व्या शतकात लिहिलेला आहे, तो १९व्या शतकात झालेल्या काल्पनिक विजयी घटनेचा, ज्यामध्ये महार सामील होते, जेणेकरून हा काल्पनिक ब्रिटिश विजय दलित चळवळीचा भाग बनु शकेल .
हा लेख हे पण सांगतो की हिंदू समाजाने दलितांना शस्त्र घेऊ दिले नाहीत किंवा स्वरक्षण करू दिले नाही. पण हा दावा महार स्वतःच खोडून काढतात. सोमवंशी महार , जो महारांमध्ये सर्वात मोठा गट आहे , ते म्हणतात की पांडवांसोबत ते महाभारत लढले होते.[4]
अनुवादन : सर्वात मोठा गट सोमवंशी किंवा चंद्रचे वंशज आहेत. ते म्हणतात की त्यांनी पांडवांसोबत कौरवविरुद्ध महाभारताचे युद्ध केले होते आणि युद्धांनंतर महाराष्ट्रात स्थयिक झाले. सोमवंशी महार हे घोडे पाळतात परंतु बावणे आणि कोसरीय होडे पळत नाहीत. …….बावणे आणि सोमवंशी महार हे एकत्र जेवतात परंतु एकमेकात लग्न करत नाहीत.
जर का दलित \ महार लोकांना शस्त्र घेणे बंदी होते तर ही परंपरा कशी निर्माण झाली?
हा पुरावा आपण दंतकथा म्हणून नाकारू शकतो, पण हे मान्यच कराव लागेल की शिवाजी महाराजांच्या सैन्यात महार लढले होते [5]. शिवनाक महाराला राजाराम महाराजांनी (शिवाजींचा राजपुत्र) कळंबी गाव भेट म्हणून दिला होत. शिवनाकचा एक नातू होता, ज्याचे नावसुधा शिवनाक महार होत. त्याने १७९५ मध्ये खर्ड्याच्या युद्धात पुरेश्वरम भाऊंचा जीव वाचवला होता. जेव्हा काही लोकांनी शिवनाक महारच्या सैन्यात असण्याला आक्षेप घेतला तेव्हा पेशव्यांचे ब्राह्मण सल्लागार हिरोजी पाटणकर त्यांना म्हणाले होते की युद्ध सुरू असताना जात महत्वाची नसते [6]. नागनाक महाराने वैराटगड मुस्लिमांकडून जिंकून राजाराम महाराजांना दिला. नागनाकाला सातार्याचा पाटील करण्यात आला होत [7].
जातींच्या नावाने हिंसाचार घडविण्यार्या मिथ्या प्रचाराला हे सर्व पुरावे छेद देतात. त्यामुळे जातींचे लढवय्ये ह्या ऐतिहासिक घटनांविषयी कधीच बोलत नाहीत.
परकीय सत्तेच्या सैन्याने स्वराज्याच्या सैन्याचा (ज्यामध्ये सामान्य जनता सहभागी होती) केलेल्या पराभवाचा जयजयकार कोणत्याही शहाण्या माणसाला आवडणार नाही आणि पटणार नाही. लांछनास्पद हे आहे की ब्रिटिश सैन्यामध्ये महार समुदायाशिवाय आणखीपण बरेच समुदायाचे लोक होते. तसेच ब्रिटिश इतिहासक मेजर डीरोम ह्यांनी लिहिले आहे की पेशवा सैन्यामध्ये बरेच सैनिक खालच्या जातीतले होते. त्याच्यामुळे ब्रिटिश आणि पेशवे दोन्ही सैन्यातील युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यात, भारतातील बर्याच समुदायांचे लोक होते. ह्याचा अर्था असाही होतो की ब्रिटिश सैन्यातील महार हे पेशवा सैन्यातल्या दलितांशी लढले !
हे सर्व पाहता, हे ब्राह्मण विरुद्ध महार हे युद्ध कसे काय होऊ शकते? ब्रिटिश सैन्यातील महारांनी पेशवा सैन्यातल्या भारतीयांना मारल (ज्यामध्ये दलित सुद्धा होते) आणि ही गोष्ट २१व्या शतकातील भारतात साजरी करतात !!
तुम्ही कधी ऐकलं आहे का कुणाला शिवनाक महारचे गौरवगान करताना? असे तुम्हाला सापडणार नाही कारण शिवनाक महारचे गौरवगान केले तर जातीय संघर्ष घडवू इच्छिनार्या लोकांच्या पायाखालची वाळू घसरेल.
असा प्रश्न येऊ शकतो की महार हे ब्रिटिश सैन्यात कसे आले? असे तर नव्हतेच की ब्रिटीशांनी काही सैनिकी प्रशिक्षण देण्यार्या संस्था काढल्या होत्या ! महारांची मराठा सैन्याकडून लढायची जुनी परंपरा होती. ज्यामुळे महारांना पेशवा सैन्यामध्ये मोठ्या संखेने घेतले. महारांनी पेशवा सैन्यातील अनुभवाचा वापर केला, युद्धकलेशी अवगत झाले आणि त्यामुळेच ब्रिटिश सैन्यात ते सैनिक म्हणून जाऊ शकले.[8]
अनुवाद : महत्वाचे म्हणजे, महार ह्यांनी त्यांच्या पेशवा सैन्यातून लढायच्या अनुभवाचा फायदा घेतला आणि ब्रिटिश सैन्यात काम करू लागले, छावणी शहरे ही समाजात वरचा स्थान मिळण्यासाठी उपयोगी पडू लागली. अंगभूत कलेच्या अभावापाई गाव सोडून शहराकडे जाणार्या पहिल्या गटात महार होते.
हे इथे नमूद करावे लागेल की महार आणि पेशवा ह्यांचे चांगले संबंध होते. पेशवा माधवरावाने १७७० मध्ये वेठी पद्धत किंवा खालच्या वर्गाकडून जबरदस्ती काम करवून घेण्याची प्रथा बंद केली. सर्व कामांची किम्मत पैशाने होऊ लागली. [9] सर्वात महत्वाचे म्हणजे, ब्रिटीशांनी गुलामगिरी बंद करायच्या ५० वर्षे आधी पेशवाईत वेठी पत्द्धत बंद करण्यात आली.
जेवा माधववरावांचा जन्म झाला होता, तेव्हा पेशवा बालाजी बाजी राव ह्यांनी ३०० हेक्टर करमुक्त जमीन कोळी, रामोशी, महार अश्या “खालच्या जातीच्या” समुदायांना दिली होती. महार आणि इतर “खालच्या जातीच्या” लोकांच्या देखरेखीखाली खूप सारे भिल्ल पहारेदार होते. [10] माधवरावांचे हे सत्कृत्य इतिहासातील पहिले नव्हते. शिवाजी महाराजांच्या वेळेस सुधा त्यांच्या ब्राह्मण सेनापति महाडजि निकांठराव ह्यांनी पुरंदर किल्ल्याची नाईक वतांदरी दोन महारांना दिली होती आणि प्रत्येकाच्या हाताखाली ४० रक्षक दिले होते.[11]
एक विशेष प्रसंग पेशवाईच्या वेळेस महारांची सामाजिक परिस्थिति कशी होती ते प्रकर्षाने दर्शवतो. १७४८ मध्ये पौडखोर येथील महारांनी जिल्ह्यातील अधिकार्याकडे खालील विनंती केली होती:
आमचे इथे एक प्रथा होती की वतनदाई जोशी हे आमच्या महारांच्या लग्नामध्ये पुजारी म्हणून यायचे. इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक ब्राह्मण महारांच्या लग्नामध्ये उपस्थित असतो. परंतु देणी घेण्यावरून आमच्यात आणि जोशी लोकांमध्ये वाद झाला त्यामुळे जोशी लोकांनी आमच्या लग्नात येणे बंद केले आहे. हे असे गेले १५-२० वर्षा झाले सुरू आहे. तरी तुम्ही कृपया इतर जिल्ह्यांचा विचार करून तुम्ही आधी जशी व्यवस्था होती तशी पूर्ववत करावी. [12]
थोडक्यात, पौडखोरीतल्या ब्राह्मण आणि महार ह्यांच्यात वाद झाला होता (पैशावरून) आणि ह्या वादामुळे ब्राह्मण लोकांनी महारांचे लग्नात येणे बंद केले होते. पेशव्यांना ही गोष्ट मुळीच आवडली नाही आणि त्यांनी ब्राह्मणांना पुन्हा महारांच्या लग्नात पुजारी म्हणून जायची आज्ञा दिली शिवाय १० रुपये दंड सुद्धा केला. (संदर्भ : ASS 1-74)
हे काही महारांना वंछित किंवा शोषित करणारे वर्तन नाहीये. ह्यानंतर पण ब्राह्मणांनी खूप विनंती केली तेव्हा एक चौकशी करण्यात आली आणि ब्राह्मणांना इच्छेनुसार महारांच्या लग्नात पुजारी म्हणून न जायची परवानगी मिळाली. तरी ब्राह्मणाना नेहमी महार आणि इतर दलित ह्यांच्या लग्नात जावेच लागायचे.
महारांना काही सामाजिक सोहळ्यात फार महत्वाचे स्थान होते. जेव्हा पंवर राजपूत नारायण देव सण साजरा करायचे तेव्हा महारांना पहिला प्रसाद मिळायचा. [13]
अनुवाद: पंवर राजपूत जेव्हा नारायण देवाचा सण साजरा करतात तेव्हा एका महाराला त्यांच्या घरी बोलावतात आणि त्याला पहिले जेवण देतात त्यानंतरच स्वतः जेवायला लागतात.
शांति सणामध्ये महरांची मुख्य भूमिका होती. ब्रिटीशांचे राज्य असताना 20 महारांना मुस्लिम व्हायचे होते, परंतु त्यांना मशिदीमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे त्यांनी विचार बदलला. [14]
जातीची ढाल पुढे करून लढणारे सर्व मागासवर्गीय लोकांना “दलित” म्हणतात आणि लोकांचा असा भ्रम करतात की हिंदु समाज हा दलित आणि अदलीत असा आहे आणि अदलीत लोकांनी दलितांचे शोषण केले. हे धादांत खोटे आहे. ज्याला आपण आज मागासवर्गीय किंवा दलित म्हणतो तेसुद्धा जातिभेद करायचे हे असे अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. एक दलित पोटजात सामाजिक पायरीवरील खाली असलेल्या दुसर्या पोतजातीच्या लोकांशी भेदभाव करायचे आणि हे सत्य कितीही झाकायचा किंवा नाकारायचा प्रयत्न केला तरी झाकले जाऊ शकत नाही.
हे इथे नमूद करयालपहिजे की महार जातीचे लोक मांग ह्या समुदायाच्या लोकांना (ज्यांना महार खालच्या जातीचे समजतात) त्यांना वाईट वागणूक द्यायचे. महार समुदायाचे लोक मांग आणि भंगी ह्या समुदायाच्या लोकांना दूषित मानत आणि ह्या लोकांकडून अन्न घ्यायचे नाहीत.[15]
एकदा एका मांग समुदायाच्या वराने बैलाऐवजी घोड्यावरून वरात केली तेव्हा महार समाजाने मांग समाजाविरुद्ध तक्रार नोंदविली होती. महार समुदायाच्या मते फक्त महार लोकांनाच घोड्यावर बसून वरात काढण्याचा अधिकार होता आणि मांग समाजाला नाही. महार समुदायाने पेशव्यांना पत्र लिहून मागणी केली होती की मांग वराना घोड्यावर बसून वरात काढण्यास बंदी आणावी आणि मांग समजाच्या वराने बैलावरूनच वरात काढून आनंदी राहाव. [16]
अनुवाद: लग्नाच्या वेळेस महार वर घोड्यावर बसून वरातीत जातो पण मांग समुदायाचा वर फक्त बैलावर बसुनच वरात काढू शकतो. आता मांग समाज त्यांच्या वरातीत घोडे वापरत आहेत त्यामुळे कृपया त्यांना आदेश द्यावा की आधी करत आल्याप्रमाणे त्यांनी वरात बैलावरूनच करावी.
घोडा हा प्रतिष्ठेचे वाहन होता आणि त्यामुळे महारांचे ठाम मत होते की फक्त ते स्वतः ह्या प्रतिष्ठेच्या योग्य होते परंतु मांग नाही. महारांच्या ह्या वर्तनाचा वर्ण किंवा स्मृतिशी काही संबंध नाहीये. कोणतीच स्मृति असे संगत नाही की महार समाजाला मांग समाजवर दर्जा आहे. त्यांच्या पेशव्यांना लिहीलेल्या पत्रात महारांनी कोणत्याही स्मृतिचा संदर्भ दिला नाही परंतु त्यावेळच्या रूढीचा आणि त्यावेळच्या सामाजिक शिडीचा संदर्भ दिला. महारांचे पेशव्यांशी संबंध चांगले असल्याने त्यांची ही मागणी मान्य झाली आणि मांग वरातीत घोड्यावरून वरात निषिद्ध करण्यात आली.
अश्या वागणुकीमुळे मांग समाजाला महार समाजाची खूप चीड होती आणि दोघामंध्ये वैमनस्य होते. इतके वैमनस्य की मांग समुदाय महारांचे कापलेले डोके पाहून आनंदी व्हायचा. ब्रिटिश अधिकार्याने लिहिले आहे की “मांग मानसाच्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे जेव्हा तो महार माणसाला फाशी देतो” [17].
परंतु दोन्ही महार आणि मांग हे ब्राह्मणांना नेहमी (धार्मिक) कामे द्यायचे आणि त्यांचा आदर करायचे. दोन्ही महार आणि मांग हे हिंदू रितींचे पालन करायचे. शांति नावाचा सण सर्व हिंदूंना एकत्रित करायचा. महार, मांग, दलित आणि अन्य हे आपले भेदभाव विसरून एकत्र येऊन हा सण साजरा करायचे.
जातीवादाला परकीय दृष्टीकोणाने पाहीले तर गटवादीपणाकडे दुर्लक्ष होते. ब्रिटीशांनी जातींच्या भिंती आणखीन पक्क्या केल्या आणि गटवादीपणाला खतपाणी घातल. ब्रिटीशांनी आधी महारांना सैन्यात घेतला कारण १९व्या शतकच्या सुरूवातीला ब्रिटिश लोक हे जो येईल त्याला सैन्यात घ्यायला होकार द्यायचे. नंतर ब्रिटीशांनी १८९२ पर्यन्त महारांना सैन्यात घेणं बंद केल होता आणि “देखणे उच्चवर्णीय पुरुष” ह्यांना सैन्यात घेताना प्राधान्य देणे सुरू केला होत. पोस्टाच्या सेवेने महारांना पारंपरिक निरोप पोहचवनाच्या कामापासुन मुकावे लागले. त्यामुळे इतर खालच्या जातींच्या लोकांसारखे त्यांनासुद्धा शहरी भागात स्थलांतरण करावे लागले. अश्या परिस्थितीत ह्या समाजांचे लोक पारंपरिक कारभारात कमी पैशावर काम करणारे मजूर बनले. अकुशल कामे जातीच्या आधारावर द्यायला सुरुवात झाली आणि जातीच्या भिंती कधी नव्हे तश्या पक्क्या झाल्या.
ब्रिटिश कालामध्ये उत्तर भारतातल्या दहन भूमीवर कार्य करणारे डोम समाजाचे लोकच हॉस्पिटल आणि मेडिकल शिक्षनामध्ये शवाघर आणि चिकित्सा विभागात सहायक म्हणून कामास लागले. वस्त्र निर्मितीत पण असेच लोक काम करायला लागले ज्यांना ब्रिटीशांनी “अस्वच्छ” मानल होत. [18]
पेशवाईत ग्रामीण भगत सहजरीत्या कामाचे स्वरूप आणि कामाचा कार्यकाल बदलू शकणारे दलित लोक, ब्रिटिश कालीन भारतीय शहरामध्ये आपल्याच जातीच्या कामात जखडून गेले. [19]
अलेक्झांडर रॉबर्ट्सन सारख्या ब्रिटिश अधिकार्यानी असा गैरसमज पसरवला की तत्पूर्वीचा पेशवा काळात दलित लोकांचे आयुष्य खूप वाईट होते आणि त्यांना काहीच संधि नव्हती. स्वतःच्या जाचक सत्तेला “शोषित समाजाचे मुक्तिदार” असे दाखवून ब्रिटिश लोकांनी जाचक सत्तेचे समर्थन केले. परंतु सत्यस्थिति पुर्णपणे वेगळी होती. जिथे एके काली पेशवा माधवराव महारांना मोठी जमीन वतन म्हणून द्यायचे, तिथे नंतर ब्रिटिश पत्रिकांनी ब्रिटिश गृहीणींना केवळ योग्य जातीच्या लोकांनाच घरकामासाठी ठेवा असे सांगितले.
सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांनी खूप सारी जंगले उध्वस्त केली आणि वनवासी लोकांचे शस्त्र काढून घेऊन त्यांना हाताखाली कामास ठेवले. ही नवीन जमीन शेतीसाठी वापरल्यामुळे धनगर मेंढपाळ इत्यादि पशुपालक समाजाचे खूप नुकसान झाले. ब्रिटिश उद्योगामुळे पारंपरिक कलाकौशल्याची वृद्धी थांबली. ब्रिटिश आधुनिकता आणि रस्ते, रेल्वे , बंदरे ह्यांच्यामुळे अकुशल आणि सोप्याने मिळणार्या कामांची मागणी वाढली. ब्रिटीशांनी आधीच्या कालांपेक्षा अधिकाधिक मोठे सैन्याच्या जागा (छावणी) करण्यास आरंभ केला. त्यांना अशा जागेच्या स्वच्छतेसाठी (मलमूत्र निवारण) तसेच चहा मळ्यासाठी स्वस्तात काम करणारे खूप लोक पाहिजे होते. ब्रिटीशांनी त्यांना महार, मांग आणि भंगी समाजातून निवडले. ह्या समाजाच्या लोकांना ब्रिटिश लोक “साफसफाई करणार्या जाती” असे म्हणायचे. “स्वच्छ जाती”, “जातीय प्रदूषण” अश्या नवीन कल्पना काढून ब्रिटीशांनी वर सांगितलेल्या कामांसाठी नेहमीच लोक मिळतील हे नक्की केले.
भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक सूझान बेली ह्यांच्याशी आम्ही सहमत आहोत की आज आपण ज्याला अस्पृश्यता म्हणून ओळखतो ते ब्रिटिश नीतींनी निर्माण केलेली गोष्ट आहे.
अस्पृश्यता ही ब्रिटिश वसाहतीच्या आधुनिकतेचा परिणाम आहे. गिरण्या, बंदर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यांनी दिलेल्या नवीन आर्थिक संधि आणि ब्रिटिश आणि ब्रिटिश शिपाई ह्यांच्या तुकड्यांसाठी निर्माण केलेला कामगार गट ह्यांच्यामुळे आधुनिक अस्पृश्यता जन्माला आली. [२०]
मनुला वाईट म्हणून मनुस्मृतीवर प्रत्येक वेळेस दोष देण्यापेक्षा आपण “जातीयतेचे आणि भेदभावाचे ग्रंथ” असे संबोधल्या गेलेल्या स्मृतींचे स्वतः वाचून आकलन केले पाहिजे. जातिभेद असतो आणि आज प्रखररीत्या अस्तीत्वात आहे. आपण सर्वांनी जातिभेद निर्मूलनासाठी कार्य केले पाहिजे. फक्त एकाच समाजाला आणि एकाच स्मृतिला दोष देण्यापेक्षा , आपली नैसर्गिक गटवादी प्रवृत्ती जातीभेदाला किती कारणीभूत होती हे विचारलं पाहिजे. फक्त एकाच समाजाला जातीयतेचा दोष देऊन आपण परत तिच गटवादी प्रवृत्ती पुनर्जीवित करत आहोत आणि जातीमधील वैमनस्य वाढवत आहोत का असाही प्रश्न पडायला हवा.
आपल्या सर्वांना ह्याची जाणीव आणि आकलन झाले पाहिजे आणि आपण ह्याच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. ह्या वर्षी तुम्ही डोळ्यावरची झापड काढून टाकण्याचा संकल्प घ्या ! स्वार्थी आणि आप्पलपोट्या घटकांना महान सनातन धर्म तोडू देऊ नका. तुम्ही स्वतः शोधा की ज्या गोष्टीच्या नावाने हे घटक नेहमी बोटे मोडतात , ती गोष्ट खरोखर वाईट आहे की त्या गोष्टीच्या वाईटपणाचा दुष्प्रचार करून आपल्याला तोडलं जात आहे.
उठा ! जागे व्हा ! आणि जोपर्यंत तुमचे लक्ष्य साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका !!
आम्ही नेहमी दलित बांधवांसोबत आणि विशेषतः महार बांधवांसोबत आहोत. आम्हाला त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे आणि त्यांना आम्ही त्यांच्या महाभारताच्या पराक्रमाची आठवण करून देऊ ईच्छितो. पण त्यांनी अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे जे समाजाची शांतता एकता नष्ट करू इच्छितात.
ह्या लेखाच्या शेवटी कठोपनिशाद मधील हा सुविचार
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत,
क्षुरासन्न धारा निशिता दुरत्यद्दुर्गम पथ: तत् कवयो वदन्ति|
अर्थ:
उठा! जागे व्हा !! गुरूंकडे जा आणि शिका !!
ज्ञानी लोक सांगतात हा मार्ग तलवारीच्या धारेसारखा आहे .
हा मार्ग चालण्यास कठीण आहे आणि पार करण्यास अवघड आहे !
संदर्भ \ References
[1] Sharaddha Kumbhojkar, Politics, Caste and remembrance of the Raj pp.40
[2] Revival of Buddhism in Modern India Page 81
[3] Bates, Crispin (1995). “Race, Caste and Tribe in Central India: the early origins of Indian anthropometry”. In Robb, Peter. The Concept of Race in South Asia. Delhi: Oxford University Press. p. 227.
[4] The Tribes And Castes Of The Central Provinces Of India Vol IV pp 132.133
[5] Jadunath Sarkar, Shivaji and his Times, P.363
[6] KV Kotawale, politics of the Dalits. 1974 pp 142-145
[7] V.Longer, Forefront for Ever: The History of the Mahar Regiment p.12
[8] Christophe Jaffrelot, Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste p.19
[9] GS Sardesai, New History of the Marathas: The expansion of the Maratha power, 1707-1772 p.346
[10] Kotani, CASTE SYSTEM, UNTOUCH ABILITY AND THE DEPRESSED p.70
[11] Ibid P.70
[12] Ibid P.73
[13] The Tribes And Castes Of The Central Provinces Of India Vol IV pp 131
[14] Ibid P.139
[15] Gazetteer of the Bombay presidency 1885 pp.440
[16] 1776. SSRPD VI-816
[17] Gazetteer of the Bombay presidency 1885 pp.443
[18] Susan Bayly, Caste, Society and Politics in India from the Eighteenth Century to the Modern Age pp.226
[19] Ibid pp.226
[20] Ibid pp.226